आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोप:जामनेरात भाजप-राष्ट्रवादीत जुंपली ; डॉ.प्रशांत पाटील यांनी सत्ताधारी भाजपवर साधला निशाणा

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रवादी व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शहरातील विकास कामांवरून पत्रकार परिषद घेत दोघा पक्षांचे पदाधिकारी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.शहरातील बजरंगपुरा भागात अज्ञाताने नगरसेवक हरवल्याचे फलक लावले होते. यावरून पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत व युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर म्हणून उपनगराध्यक्ष नाना बाविस्कर यांनी विकासकामांचा पाढा वाचून दाखवत, विरोधकांना जाब विचारला. त्यानंतर मुस्लीम मोहल्ल्यातील काही नागरीकांनी पत्रकार परिषदेत अस्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. हाच धागा पकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत उपनगराध्यक्षांच्याच वाॅर्डात अस्वच्छता असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...