आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जामनेरात जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे साकडे‎ ; आज 900 पेक्षा अधिक शिक्षक अन् कर्मचारी जाणार संपावर‎

जामनेर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना लागू करावी या‎ मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी‎ एकवटले असून, आज दि.१४ पासून‎ अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य सर्व‎ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला‎ आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी‎ जामनेर येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी‎ गटविकास अधिकारी व‎ तहसीलदारांना निवेदन दिले.‎ २००५ पासून शासकीय सेवेत रुजू‎ झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर‎ पेन्शन न देण्याचा निर्णय शासनाने‎ घेतला आहे. वयाची २२ ते ३२ वर्ष सेवा‎ देऊनही पेन्शन मिळणार नसल्याने सर्व‎ कर्मचारी अस्वस्थ होते. जुने पेन्शन‎ मिळावे यासाठी २००५ पासूनच विविध‎ संघटना पदाधिकाऱ्यांच्या चर्चा‎ निष्फळ ठरत आले आहेत.

त्यामुळे‎ आता सर्व कर्मचारी एकवटले असून‎ पेन्शन मिळालेच पाहिजे या‎ मागणीसाठी १४ मार्चपासून‎ अत्यावश्यक सेवा वगळता शिक्षक‎ शिक्षकेतर व महसूल कर्मचारी आधी‎ बेमुदत संपावर जात आहेत. जामनेर‎ तालुक्यातील तब्बल ९०० शिक्षकांसह‎ महसूल व अन्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत‎ संप पुकारला आहे. सोमवारी येथील‎ जुनी पेन्शन योजना संघटनेतर्फे‎ गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे व‎ तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात‎ आले. यावेळी विविध संघटनांचे‎ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...