आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:माचले येथे डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर‎ गावात धुरळणी; कंटेनरची केली तपासणी‎

चोपडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माचले येथे डेंग्यू पूर्व प्रतिबंधक‎ म्हणून धुरळणी व पाण्याच्या कंटेनरची तपासणी करण्यात‎ आली. या वेळी आठवड्यातून एक दिवस कोरडा‎ पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी सरपंच‎ सुरेखा पाटील, उपसरपंच नितीन निकम, ग्रामपंचायत‎ सदस्य लक्ष्मण बाविस्कर, बाळू पाटील, ग्रामसेवक रमेश‎ देवरे, शिपाई प्रवीण पाटील, भिकन बाविस्कर, तालुका‎ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर व वैद्यकिय‎ अधिकारी डॉ. शर्वरी पाटील, तालुका हिवताप पर्यवेक्षक‎ जगदिश बाविस्कर, आरोग्य सहायक काटे, आरोग्य सेवक‎ विजय देशमुख, तावसे बुद्रुक येथील सुनील महाजन,‎ माचले येथील महेंद्र पाटील, धनवाडी येथील रमेश पवार,‎ आडगाव येथील दिनकर वाघ, समुदाय आरोग्य अधिकारी‎ डॉ. वर्षा पाटील, आरोग्य सेविका शेवंता बारेला, आशा‎ सेविका अलका पाटील उपस्थित होते. या उपक्रमाचे‎ ग्रामस्थांकडून काैतुक केले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...