आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोप:पाचोऱ्यात सत्ताधाऱ्यांनी नव्हे, शिंदेंनी लाटले भूखंड, आमदारांचा पलटवार

पाचोरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेविड काळात पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी २०० कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केलेले आरोप खोटे व दिशाभूल करणारे आहेत. अमाेल शिंदे यांचे वडील पंडित शिंदे हे नगराध्यक्ष असताना त्यांनी व सतीश शिंदे यांनी भूखंड लाटले आहेत. शिंदे माध्यमिक विद्यालय परिसरातील नागरिकांनी याबाबत दावेही दाखल केले आहेत, हे सर्व जनतेला माहित आहे. त्यांनी हडप केलेले भूखंड परत मिळवून देण्यात येईल व बदनामी केल्याने अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.

अमोल शिंदे यांनी पालिका व सत्ताधाऱ्यांवर २०० कोटींचा भूखंड घोटाळ्याचा पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.२६) आमदार किशोर पाटील यांनी पत्रपरिषद घेऊन अमोल शिंदे व कुटुंबीयांवर त्यांनी आरोप केले आहेत. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, मुकुंद बिल्दीकर, तालुका प्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, ज्ञानेश्वर चौधरी, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक शीतल सोमवंशी, राम केसवाणी, वाल्मिक पाटील, सतीश चेडे, रहिमान तडवी, बापू हाटकर, प्रवीण ब्राम्हणे, शिवदास पाटील शेखर पाटील उपस्थित होते.

शिंदेंनी आरक्षण उठवून विद्यालयाची इमारत उभारली
बिल्दीकर म्हणाले, अमोल शिंदे यांचे वडील पंडित शिंदे हे नगराध्यक्ष असतांना त्यांनी विवेकानंद नगर भागातील भूखंड असलेल्या जागेवर आरक्षण उठवून त्या ठिकाणी त्यांची शिंदे माध्यमिक विद्यालयाची इमारत उभी केली आहे. यावर परिसरात नागरिक अनेक वर्षांपासून न्याय मागत आहे. या शिवाय शहरातील सेंट्रल हॉलमध्ये व नवजीवन सुपर शॉपीचे बांधकाम करतांना कोणत्याही प्रकारची सुविधा न देता नकाशात दाखवलेल्या जागेपेक्षा जास्त बांधकाम केले आहे. नुराणी नगर येथील ओपन स्पेस हडपला आहे.

अमोल शिंदे यांचे काका सतीष शिंदे यांनी भास्कर नगर जवळील सुशील डेअरीचे बांधकाम करतांना येथील ओपन स्पेसची ५० टक्के जागा हडप करुन त्यावर बांधकाम केले आहे, याशिवाय त्यांच्याच काळात रमेश वाणी, सुरेश मोर, रमेश मोर व अतुल संघवी यांनी पालिकेच्या जागेवर डल्ला मारला आहे. असे असतांना २०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा खोटा आरोप करीत आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असून अब्रूनुकसानीचा दावाही दाखल करणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...