आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:पारोळ्यात प्रभाग एक अनु. महिला राखीव ; माजी उपनगराध्यक्ष अनुष्ठान यांना फटका

पारोळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रभाग एकमध्ये अनुसूचित जातीसाठी प्रभाग एकमध्ये महिला राखीव आरक्षण निघाले आहे. याचा फटका माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, शहर विकास आघाडीचे गौतम वानखेडे यांना बसला आहे. या प्रभागात २१९२ मतदार असून बाकी इतर प्रभागात मात्र एक महिला एक सर्वसाधारण असेच चित्र दिसून आले. आरक्षण सोडतीची चिठ्ठी गौतमी मोरे या बलिकेने काढली . सोमवारी प्रांताधिकारी विक्रम बादल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची आरक्षण सोडत काढली गेली. यात फक्त प्रभाग नऊ व प्रभाग एकसाठी सोडत काढली गेली. यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी सांगितले की पारोळा पालिकेसाठी २०११च्या जनगणने नुसार ३७,६६६ मतदार असून, १२ प्रभागात २४ नगरसेवक असतील. त्यात १२ महिलांचा समावेश आहे. तरी प्रभाग एक व प्रभाग नऊ जो अनुसूचित जमाती साठी राखीव आहे त्यातील ‘अ’ हा महिला तर ‘ब’ हा सर्वसाधारण राहील. यात ८११ मतदार संख्या असेल, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...