आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:धरणगावातील बैठकीत अतिवृष्टी, पंचनामे, पाणीपुरवठ्याचे मुद्दे गाजले

धरणगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज धरणगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नुकसानीची माहिती घेतली. तसेच सरसकट पंचनामे करण्याचे तहसीलदारांना सूचना दिल्या.

या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी तसेच, पदाधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. दिवाळीतील आनंदाचा शिधा ही योजना नियोजनअभावी फसली असून अनेकांना आजही शिधा मिळाला नसल्याची तक्रार सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली.

तसेच संजय गांधी निराधार योजनेची मागील काही महिन्यांपासून बैठक घेतली नसल्याची बाब देखील दानवे यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, धरणगावचा पाणीपुरवठा या विषयावर गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बैठकीत चांगलेच वाभाडे काढले. या वेळी विष्णू भंगाळे, अॅड. शरद माळी, धीरेंद्र पुरभे, योगेश वाघ, जानकीराम पाटील, विनोद रोकडे, जयेश माळी आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

क्रांती करायला हे काय मंगल पांडे आहेत काय?
पाचोरा | भगतसिंग, राजगुरू, मंगल पांडे यांनी देशात क्रांती घडवण्यासाठी जीवनाचा त्याग केला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांनी उठाव केला. महाराष्ट्रात मूळ शिवसेनेपासून ४० आमदारांनी पक्षाशी व शिवसेनेशी स्वार्थासाठी गद्दारी करून वेगळे झाले. मात्र ते म्हणतात की आम्ही बंड केले, उठाव केला, क्रांती केली. उठाव व क्रांती करण्यासाठी हे काय मंगल पांडे आहेत काय? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...