आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:वाघळूदमध्ये प्रांतांच्या आदेशाने रस्ता मोकळा ; कलम 133 अन्वये दाखल दाव्यावर निकाल

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंजाळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वाघळूद येथील रस्ता एका शेतकऱ्याने अडवला होता. या संदर्भात नागरिकांनी थेट फैजपूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी प्रक्रिया १३३ अन्वये न्याय निर्णयासाठी दावा दाखल केला होता. यात प्रांताधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचा येण्या-जाण्याच्या रस्त्यावरील कुंपण व मातीचा थर काढून त्वरित रस्ता खुला करून द्यावा, असे आदेश काढले. त्यामुळे रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वाघळूद येथील गट क्रमांक १२७ मध्ये गावकऱ्यांसाठी जाण्या-येण्यासाठीचा रस्ता होता. हा रस्ता संगीता शेषराव वाघ, रा.श्रीराम नगर, उल्हासनगर, जि. ठाणे यांनी अडवला होता. त्यांनी या रस्त्यात कुंपण केले होते आणि मातीचा थर टाकला होता. या संदर्भात त्यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही हा रस्ता मोकळा झाला नव्हता. त्यामुळे वाघळूद येथील निखिल पंढरीनाथ सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी मिळून फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे कलम १३३ अन्वये न्याय निर्णयासाठीचा दावा दाखल केला. यात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आदेश करत गट क्रमांक १२७ मधील रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश काढला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवक के.जी. पाटील यांनी हा रस्ता मोकळा करून दिला. यामुळे ग्रामस्थांना सुविधा हाेऊन दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

बातम्या आणखी आहेत...