आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील य.ना. चव्हाण महाविद्यालयात २३ व २४ मार्च रोजी आयाेजित स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सामान्यज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेचे यंदाचे ११वे वर्ष असून बुधवारी सकाळी १० वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते स्व.संदीप चव्हाण, सरस्वती देवी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.
यंदा ह्या स्पर्धेत पहिल्या दिवशी दुपारपर्यंत जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांचे जवळपास ८ संघ सहभागी झाले होते. अजून त्यात भर पडण्याची शक्यता असून दोनदिवसीय स्पर्धेचा निकाल गुरुवारी निकाल जाहीर होईल. त्यानंतर होणाऱ्या समारोप साेहळ्यात स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण केले जाणार आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ध्येय जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी होण्याऐवजी ज्ञानार्थी बनले पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी उद्घाटक किरण देशमुख यांनी केले. राष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव संजय रतनसिंग पाटील, स्पर्धेचे प्रायोजक व संचालक बाळासाहेब चव्हाण, धनंजय चव्हाण, किशोर देशमुख, सुधीर पाटील, लक्ष्मण चव्हाण, मनोहर सूर्यवंशी, संस्थेचे सर्व संचालक, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, उपप्राचार्य डॉ.एस.डी. महाजन, उपप्राचार्या डॉ.उज्वल मगर, उपप्राचार्य व आयक्यू एसी समन्वयक डॉ.जी.डी. देशमुख, उपप्राचार्य डॉ.पी.जे. परमार, डॉ.साधना निकम, स्पर्धा समन्वयक डॉ.जी.बी. शेळके, डॉ. आर.पी. निकम आदी मान्यवर उपस्थिती होते.

अपयशाने खचू नका, नव्या उमेदीने प्रयत्न करा, यश निश्चित : देशमुख
प्रशासकीय क्षेत्रात सेवा करायची असेल तर आपले करिअर घडवण्यासाठी विविध विषयांच्या अभ्यासाची तयारी आतापासून करा, असे आवाहन देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन वारंवार घेतले पाहिजे. काही समस्या असतील तर त्यांचे निराकरण वेळेवरच केले पाहिजे. त्याचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरतो. परीक्षेत अपयश आले तर त्यामुळे खचून जाऊ नका. तर पुन्हा उमेदीने प्रयत्न करा. यश निश्चित मिळेल, असेही त्यांनी सांगितले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.निमा गोल्हार, प्रा.मंगला सूर्यवंशी, डॉ.करुणा गायकवाड यांनी केले.
अभ्यासाशिवाय पर्याय नाही
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्यासाठी अभ्यासाकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. त्या शिवाय आपल्याला स्पर्धेत टिकता येत नाही. त्यामुळे याच वयापासून आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला यश प्राप्त करून प्रशासकीय सेवेत जाता येणार नसल्याने रात्रंदिवस अभ्यास करून यशस्वी व्हा, असे विद्यार्थी, स्पर्धकांना आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.