आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर येथील नगर परिषद कार्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वीज निर्मितीच्या उपकरणाचे उद्घाटन व लोकार्पण माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही संकल्पना मांडणारे व पर्यावरणपूरक उपकरण बनवल्याबद्दल प्रशासक व मुख्याधिकारी यांनी विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांचे काैतुक केले. तसेच अशी उपकरणे अजून तयार व्हायला हवीत, असे मत पुष्पलता पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी पालिकेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड, माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी संजय चौधरी, नगर अभियंता अमोल भामरे, डिगंबर वाघ, नगर रचना सहायक विकास बिरारी, आबिद शेख व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हे उपकरण पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची गर्दी झाली होती. अभियंता प्रशांत ठाकूर यांनी या उपकरणाची उपस्थितांना कार्यपद्धती सांगितली. अशा पद्धतीने कार्य करते यंत्र कार्यालयात बरेच नागरिक दररोज कामानिमित्त पालिकेत येतात. नागरिक ज्यावेळी पालिकेच्या प्रवेशद्वारावरील मॅट वर पाय ठेवतील, त्यावेळी तेथे असलेली पॉवर स्टेप प्रणाली कार्यान्वित होईल.
ज्यामुळे प्रणालीतील शक्तीशाली चुंबकामध्ये हालचाल निर्माण होवून आतील कॉपर कॉईलमध्ये ईएमएफ अर्थात व्होल्टेज तयार होईल. आता एका पावलाने साहाजिकच कमी प्रमाणात व्होल्टेज तयार होईल. परंतु अशीच हालचाल सतत होत राहिल तेव्हा मोठ्या प्रमाणात व्होल्टेज तयार होईल. तयार झालेले व्होल्टेज एका बॅटरीत स्टोअर करण्यात येईल. या यंत्राद्वारे पूर्णपणे डिस्चार्ज झालेली बॅटरी साधारण ८ तासात चार्ज होईल. म्हणजे कार्यालय १० ते ६ वेळेत नागरिकांच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होईल. पूर्ण चार्ज झालेली बॅटरी आपणास दिवे प्रकाशित करण्यासाठी वापरता येईल. रात्री ९ व्हॅटचे दोन दिवे साधारण ६ ते ७ तास सुरु राहतील. या दिव्यांना पीआयआर मोशन सेंसॉर लावलेले आहेत. ज्यावेळी एखादी चल वस्तू सेंसॉरच्या क्षेत्रात आल्यास प्रवेशद्वारावरील दिवा ऑटोमॅटिक प्रकाशित होईल. ज्यामुळे तयार ऊर्जेची बचत होईल.
असे उपक्रम राबवणार ऊर्जा बचतीकडे एक पाऊल उचलेले आहे. यामुळे आम्ही म्हणतो ‘तुमचे एक पाऊल ऊर्जा निर्मीतीसाठी’. हा प्रयोग शहरातील नागरिकांची वर्दळ जेथे असेल अशा इतर ठिकाणी राबवू. जसे मार्केट, उद्यान, शासकिय कार्यालये, बँक येथे हा उपक्रम राबवू , अशी भावना प्रशांत सरोदे यांनी व्यक्त केली.
राज्यातील ठरणार पहिली नगरपालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा या घटकात अमळनेर पालिकेचा आदर्श ऊर्जा निर्मिती व बचतीचा हा महत्वकांशी प्रकल्प असून ताे प्रायोगिक तत्वावर उभारलेला आहे. असा प्रकल्प राबवणारी अमळनेर महाराष्ट्रातील पहिली पालिका ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.