आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील विवेकानंद विद्यालयात भारत सरकार, निती आयोगातर्फे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत आर्थिक निधीतून उपलब्ध झालेल्या अटल टिंकरिंग लॅब अर्थात अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन चाळीसगाव येथील विद्याभारतीचे संघटन मंत्री प्रकाश पोतदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्याभारतीचे प्रांताध्यक्ष डॉ. विवेक काटदरे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, राजेश पाटील, डॉ. जयवंत जडे, डॉ. भार्गवी पोतदार, डॉ. पूनम पोतदार, मुख्याध्यापिका आशा चित्ते उपस्थित होत्या. अटल टिंकरिंग लॅबचे प्रशिक्षक योगेश पाटील व विज्ञान शिक्षक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पाचवी ते दहावीच्या श्रीकांत चौधरी, प्रज्ञेश निकम, सत्यम पाटील, आर्यन मेढे, वरद पाटील, सर्वेश जोशी, मेहुल कंखरे, सुबोध पाटील, सोहम वाघ, यज्ञेश धनगर, जयेश कोळंबे, मयुरेश शिंदे, हितेश पाटील, तन्मय दातीर, प्रणव पाटील आदी विद्यार्थ्यांनी स्वतः या लॅबमध्ये मॉडेल्स तयार करून त्यांचे प्रदर्शन भरवले हाेते. या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. या लॅबचे सुशोभीकरण कला शिक्षक राकेश विसपुते यांनी केले. पवन लाठी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.