आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:भातखंडे येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

भडगाव‎8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी‎ रावजी पाटील किसान शिक्षण संस्था‎ संचालित भातखंडे माध्यमिक‎ विद्यालयात २३ ते ३० सप्टेंबर दरम्यान‎ आयोजित कर्मवीर हरी रावजी पाटील‎ पुण्यस्मरण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी‎ कार्यक्रमाचे तसेच कबड्डी स्पर्धेचे‎ उद्घाटन दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन‎ करून करण्यात आले. या वेळी स्वर्गीय‎ कमलताई पाटील यांच्या जयंतीनिमित्त‎ त्यांना अभिवादन करण्यात आले.‎

अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष‎ अशोक पाटील यांनी होते. या प्रसंगी‎ स्कूल कमिटी सदस्य गोरख पाटील,‎ अजबराव पाटील, अरुण पाटील, सुरेश‎ पाटील, सुभाष पाटील, माजी सरपंच‎ पंडितराव पाटील, निवृत्त शिक्षक‎ गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक एस.‎ एन. पाटील उपस्थित होते. या‎ सप्ताहातील प्रथम पुष्प विद्यार्थ्यांचे‎ आरोग्य व मोबाइलचे दुष्परिणाम या‎ विषयी व्याख्यान घेण्यात आले. यानिमित्त‎ कबड्डी स्पर्धेचे उद‌्घाटन करण्यात आले.‎

या सप्ताहात पहिले पुष्प गुंफताना आरोग्य‎ अधिकारी डॉ. सुचिता आकडे, पिंपरखेड‎ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक‎ भोसले, मेडिकल ऑफिसर डॉ. अपूर्वा‎ बागड, गट प्रवर्तक शीला कोळी, रश्मी‎ अहिरे, आरोग्यसेविका मनीषा परदेशी,‎ आरोग्य कर्मचारी योगेंद्र विसपुते उपस्थित‎ होते. दरम्यान, या वेळी कबड्डी स्पर्धा‎ घेण्यात आली. या वेळी डॉ. प्रतीक‎ भोसले यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य व‎ मोबाइलचे दुष्परिणाम या विषयावर‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुचिता‎ आकडे यांनी आरोग्याबाबत घ्यावयाची‎ काळजी यावर मार्गदर्शन केले.‎ सूत्रसंचालन बी. एन. पाटील यांनी केले.‎