आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:मुसळी येथे फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन

चाळीसगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुसळी येथे जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धरणगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय व धरणगाव वकील संघा मार्फत फिरत्या न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. फिरत्या न्यायालयाचे धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश अविनाश ढोके यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.

या प्रसंगी धरणगाव न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गजानन पाटील, अॅड. महेंद्र चौधरी, न्यायाधीश अविनाश ढोके यांनी मार्गदर्शन केले. पॅनलमध्ये अॅड. व्ही. एस. भोलाणे, अॅड. शिंदे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी नीता जाधव, मुसळीच्या सरपंच माधुरी मराठे, उपसरपंच मन्यार, धरणगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष सी. झेड. कटारे, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. संदीप सुतारे, अॅड. मनोज दवे, अॅड. डी. ए. माळी, अॅड. प्रदीप पाटील, अॅड. बी. के. आवारे, अॅड. कैलास मराठे यांच्यासह बहुतांश ग्रामस्थ हजर होते. या उपक्रमास धरणगाव न्यायालयाचे कर्मचारी विनोद सपकाळे, गणेश चौधरी, ईश्वर चौधरी, संतोष चौधरी, जगदीश माळी, अनिल बाविस्कर, रवींद्र सैंदाणे यांनी सहकार्य केले. अॅड. प्रशांत क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...