आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील महात्मा गांधी उद्यान आबालवृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आगामी काळात अद्यावत स्विमिंग टॅंक उभारणार असून उपजिल्हा रुग्णालय व शासकीय विश्रामगृहाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. शासनाने दिव्यांगासाठी सुधारित विकास धोरण आणले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे पुनर्वसन होणार असून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथे दिव्यांग मेळावा व महात्मा गांधी उद्यानाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री व दिव्यांग बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील व दिव्यांग महासंघाने मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, गोपाल चौधरी, पवन सोनवणे, तालुका प्रमुख गजानन पाटील, सचिन पवार, भाजपचे सुभाष पाटील, अॅड. संजय महाजन, श्रीकांत बिऱ्हाडे, सुमित पाटील, पप्पू भावे, शिरीष बयस, भानुदास विसावे, विलास महाजन, अंजली विसावे, भगवान महाजन, वासुदेव चौधरी, विजय महाजन, अहमद पठाण, नंदकिशोर पाटील, अजय चव्हाण, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, कैलास माळी, फिरोज पटेल, तौसीफ पटेल व रमीज पटेल उपस्थित होते.
दिव्यांग संघटनेचे संजय पाटील, प्रतिभा पाटील, सरला सोनवणे, अश्फाक बागवान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी कंखरे, प्रास्ताविक पी. एम. पाटील यांनी केेले. पप्पू भावे व भैया महाजन यांनी आभार मानले. दरम्यान, स्वर्गीय सलीम पटेल यांनी शहरात सुशोभित उद्यान निर्मितीचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार पालकमंत्र्यांनी २ कोटीचा निधी देत स्वर्गीय सलीम पटेल यांची स्वप्नपूर्ती केली आहे.
दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव ... राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघातर्फे दिव्यांगासाठी कार्य केल्याबद्दल तहसीलदार नितीनकुमार देवरे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलिस निरीक्षक राहुल खताळ या अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांनी गाैरव केला.
पालकमंत्र्यांनी पूर्वा पाटीलला दुचाकी भेट ... इंदिरा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा विनोद पाटील हिने ९६ टक्के गुण प्राप्त करून दहावीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पालकमंत्री यांच्यातर्फे तिला दुचाकी भेट देण्यात आली. नशिराबाद येथील ३०० पैकी प्रातिनिधिक स्वरुपात १५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपयांचे धनादेश तसेच दिव्यांग सन्मान पत्र, पिवळे रेशन कार्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
धरणगाव | येथील पालिकेच्या महात्मा गांधी उद्यानाचे नूतनीकरण केले असून त्याचे ३ डिसेंबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, त्याच्या आदल्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी उद्यानात जाऊन पाहणी करत घोषणाबाजी केली. या वेळी सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, अॅड. शरद माळी, राजेंद्र ठाकरे व शिवसैनिक हजर होते. या वेळी गुलाबराव वाघ म्हणाले की, या उद्यानासाठी नीलेश चौधरी नगराध्यक्ष असताना चौदाव्या वित्त आयोगातून त्यांनी निधी आणला होता. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी विशेष निधी दिला होता. त्यामुळे याचे श्रेय शिंदे गटाला घेण्याचा अधिकार नसल्याचे वाघ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.