आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:ललित कला केंद्रातील ‘स्पंदन’ हस्तलिखित भित्तिपत्रकाचे उद्घाटन

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्र या संस्थेत स्वातंत्र्याची ७५वर्षे : काय कमावले, काय गमावले?’ या स्पंदन हस्तलिखित भित्तिपत्रकाचे ६१व्या विशेषांकाचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

याप्रसंगी विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजक आशिष गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, गझलकार योगीता पाटील, निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय धनगर, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, कवी बाळकृष्ण सोनवणे, अभियंता व्ही. एस. पाटील आदी उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख म्हणून प्रा. विनोद पाटील तर संकल्पना, सजावट व अक्षरलेखन नम्रता अग्रवाल, कांचन कोळी, शिवम सैंदाणे, देवेश बाविस्कर, अदिती जोशी, धनश्री पाटील, सिद्धार्थ ढिवरे, मयूर राजपूत, माधुरी पाटील, नम्रता सावकारे, कोमल लोहार, भूपेंद्र महाजन, आकाश पावरा, इसाक पावरा या विद्यार्थ्यांनी केले आहे. फलक लेखन प्रा. सुनील बारी यांनी केले.

यांच्या विषयी आहे माहिती : या भित्तिपत्रकात ९८ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक मोहनलाल गुजराथी, प्रा. अरुण गुजराथी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी, शेतीतज्ज्ञ भागवत पाटील, कवी अशोक सोनवणे, हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ. सुभाष महाले, इंदिरा पाटील, विजया पाटील, मुख्याध्यापक बी. एन. चौधरी, कवी अशोक कोतवाल, चित्रकार राजू बाविस्कर, डॉ. विकास हरताळकर, सुधाकर केंगे, प्रताप विद्यालयाच्या सचिव माधुरी मयूर, चित्रकार पिसुर्वो आदी मान्यवरांची चिंतनशील मते कलात्मक पद्धतीने मांडलेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...