आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्याची दैनंदिन आवक 90 टक्क्यांनी घटली:अमळनेर बाजार समितीचे उत्पन्न 20 लाखांवरून 20 हजारांवर

अमळनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून अमळनेर बाजार समितीत धान्याची आवक कमी झाली आहे. सोमवारी ९०० क्विंटल धान्य विक्रीला आले. मार्च ते जून या काळात दररोज सुमारे आठ ते दहा हजार क्विंटल धान्याची आवक होत असे. त्या तुलनेत सध्याची आवक केवळ १० टक्क्यांवर आली आहे. यामुळे बाजार समितीची आर्थिक उलाढालदेखील कमी झाली आहे. त्यामुळे हंगामात दिवसाला वसूल होणारी २० लाखांचे बाजार समिती शुल्क सध्या केवळ २० हजारांवर आले आहे.

अमळनेर बाजार समितीत मार्चपासून दररोज आठ ते दहा हजार क्विंटल धान्याची आवक होत असे. त्यामुळे दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होत असे. तसेच हमाल, मापाडी यांच्या हाताला काम मिळत होते. मात्र, आवक कमी झाल्याने हमालांना मिळणारा रोजगार कमी झाला आहे. सध्या केवळ उघड्यावर पडलेल्या मालाची गोदामात रवानगी करण्यासारखी किरकोळ कामे सुरू आहे. पावसामुळे धान्याची आवक मंदावली आहे. सध्या गहू, बाजरी व ज्वारी तसेच हरभऱ्याची केवळ थोडीफार आवक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...