आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस.टी. महामंडळातील कंत्राटी:कंत्राटी एसटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्या

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एस.टी. महामंडळातील कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन मंगळवारी आमदार किशोर पाटील यांना या कर्मचाऱ्यांनी दिले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून नंतर सुमारे सहा महिने चाललेल्या एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एस.टी.ची सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार होती. अशा संघर्षमय काळात जळगाव विभागातील एकूण ११० तर राज्यभरातील ८०० कंत्राटी चालक, वाहकांनी परिवहन सेवा सुरू ठेवून एस.टी. महामंडळास जीवदान दिले आहे.

शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशानंतर महामंडळाचे नियमित चालक, वाहक कामगार संप साेडून कामावर रूजू झाल्याने या सर्व कंत्राटी वाहक, चालकाकडे एस.टी. महामंडळ व संबंधित कंपनीने दुर्लक्ष करत त्यांची सेवा खंडित केली. सेवेदरम्यान कंत्राटी कंपनीशी ठरलेल्या करारानुसार ठरलेल्या वेतनातही मोठी तफावत दिसत आहे. ३ सप्टेंबर रोजी वाहतूक विभागाने सर्व कंत्राटी चालक, वाहकाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा शासनादेश काढला. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या वाहकांच्या मनात निराशेची भावना निर्माण झाली आहे.

त्यातून काही विपरीत घडू नये यासाठी योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करावे, असे नमूद केले आहे. याप्रसंगी समाधान पाटील, समाधान पवार, हरिभाऊ पाटील, नरेंद्र पाटील, कमलसिंग चौधरी, बापू पवार, यशवंत खैरनार, प्रशांत पाटील, मच्छिंद्र कोळी, प्रवीण वाघ, पंकज पाटील, ललित श्रावणे यांच्यासह चालक व वाहक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...