आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना मदत करा:चोपडा तालुक्यात उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

चोपडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उसाच्या पिकावर माेठ्या प्रमाणावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. या संकटकाळात शेतकऱ्यांना साखर कारखाना व कृषी विभागाने मदत करावी, या संदर्भात शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केली. तहसीलदारांना निवेदन देवून मदतीचे आवाहन केले आहे.तालुक्यातील गेल्या काही वर्षापासून सर्वत्र पांढरी माशीचा प्रादुर्भाव हाेतो. परंतु क्रायसोफर या मित्र कीडच्या अंड्यांचा वापर कारखाना व शेतकरी करायचे. त्यात एखादा दमदार पाऊस झाल्यास ते आटोक्यात येत होते. मात्र, यंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला नसून शेतकरी केवळ क्रायसोफर वापरून या किडीला अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरीही कीड आटोक्यात न आल्याने तालुक्यात उसाचे उत्पादन प्रचंड घटणार आहे तर काहींना ऊस काढून फेकावा लागेल, अशी अवस्था आहे.

शेतकरी आर्थिक दृष्ट्या नाडला गेला असून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व बारामती अॅग्रो (साखर कारखाना) यांच्या मदतीने फवारणीसाठी औषधी अनुदान व मदतीची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, पाल कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक महाजन, बारामती अॅग्रो कारखान्याचे सुभाष गुळवे, कार्यकारी संचालक देशमुख, शेतकी अधिकारी देसले, अकबर पिंजारी या साऱ्यांशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...