आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबाेधन‎:व्याख्यानात एड्सची माहिती‎ देवून केले तरुणांचे प्रबाेधन‎

पाराेळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राणी लक्ष्मीबाई‎ महाविद्यालयात जागतिक एड‌्स‎ दिनानिमित्त व्याख्यानाचे अायाेजन‎ करण्यात अाले हाेते.‎ येथील राणी लक्ष्मीबाई‎ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा‎ योजना विभाग, रेड रिबन क्लब व‎ कुटीर रुग्णालयातील‎ आयसीटीसीच्या संयुक्त विद्यमाने‎ जागतिक एड्स दिनानिमित्त‎ व्याख्यान झाले.

या कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. संजय‎ भावसार होते. तर डॉ. किशोर‎ पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून‎ उपस्थित हाेते. त्यांनी किशोरवयीन‎ मुलांना एड‌्स कशामुळे होतो, एड‌्स‎ एचआयव्हीबद्दल विस्तृत माहिती‎ दिली. या कार्यक्रमास कुटीर‎ रुग्णालयातील डॉ. बबन महाजन व‎ स्वयंसेवक उपस्थित होते. याच‎ कार्यक्रमात पोस्टर्सद्वारे एड्सविषयी‎ जनजागृती करण्यात आली.‎ सूत्रसंचालन व एड्स प्रतिबंधक‎ शपथेचे वाचन कार्यक्रम अधिकारी‎ डॉ. संभाजी सावंत यांनी केले. प्रा.‎ पी. बी. पाटील यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...