आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:ब्राम्हणशेवगे तलावाची अधिकाऱ्यांकडून पाहणी ; लाईन कंपनीच्या मदतीने एक गाव एक तलाव सेवा तलावाची निर्मिती

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मणशेवगे येथे तयार करण्यात येणाऱ्या तलावाची जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह स्थानिक तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून व सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून व केअरिंग फ्रेंइस, व वेंडर लाईन कंपनीच्या मदतीने एक गाव एक तलाव सेवा तलावाची निर्मिती होत आहे. या तलावाची जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, चाळीसगाव पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या वेळी उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, बिडीओ मनोज धांडे, जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील, सहाय्यक इम्रान तडवी, हिरकणी महिला मंडळ अध्यक्षा सुचित्रा पाटील, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प चमूचे दयाराम सोनवणे, राहूल राठोड, पंकज राठोड, तुषार पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर राठोड, सोमनाथ माळी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...