आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा‎ प्रबोधनी:आंतरविद्यापीठ खो-खो,‎ जयेश सैंदाणेची निवड‎ ; राजस्थानातील स्पर्धेत करणार उमविचे प्रतिनिधित्व‎

अमळनेर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील बांसवाडा येथील‎ गोविंद गुरु ट्रायबल विद्यापीठात,‎ दि.४ ते ६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या‎ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ‎ खो-खो स्पर्धेसाठी, कवियत्री‎ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठाच्या संघात, जी एस क्रीडा‎ प्रबोधनी व प्रताप महाविदयालयाचा‎ अष्टपैलू खेळाडू जयेश रतिलाल‎ सैदाणे याची निवड करण्यात आली‎ आहे.‎ विद्यापीठाचा संघ राजस्थानला‎ रवाना झाला आहे. तसेच प्रशिक्षक‎ पदी प्रा.जितेंद्र पाटील जळगाव या‎ दोघांचे अभिनंदन करुन त्यांचा‎ सत्कार करण्यात आला.

जयेशच्या‎ निवडीबद्दल खा.शि.मंडळचे‎ कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष‎ योगेश मुंदडे, संचालक डॉ.संदेश‎ गुजराथी, संचालक प्रदीप अग्रवाल,‎ संचालक डॉ.अनिल शिदे,‎ संचालक नीरज अग्रवाल, संचालक‎ विनोद पाटील, संचालक कल्याण‎ पाटील, प्राचार्य प्रा.डॉ.एम.एस.वाघ,‎ सचिव ए.बी.जैन, शिक्षक प्रतिनिधी‎ विनोद कदम, सिनियर कॉलेज‎ क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील,‎ प्रा.ए.के.अग्रवाल, तालुका क्रीडा‎ अध्यक्ष एस.पी.वाघ यांनी जयेशचे‎ अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...