आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मागणी:कजगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा‎; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले साकडे‎

पारोळा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा‎ शहरातील कजगाव जाणाऱ्या राज्य‎ मार्गावर नाका ते प्रा. राजेश पाटील‎ यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा‎ रस्ता मंजुर आहे. या रस्त्याचे‎ रखडले असून जे अर्धवट काम‎ झाले ते निकृष्ट झाले आहे. या‎ कामाची चौकशी करावी, अशी‎ मागणी तालुका भाजपने सार्वजनिक‎ बांधकाम विभागास दिलेल्या‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎ निवेदनात म्हटले आहे की, या‎ रस्त्याचे काम जवळपास ४‎ महिन्यांपासून सुरु आहे. परंतु,‎ सिमेंट रस्त्याचे काम संबंधित‎ ठेकेदार मंजुर इस्टीमेटप्रमाणे करत‎ नाही. जे काम आजपर्यंत झाले, ते‎ देखील निकृष्ट दर्जाचे आहे.

या‎ त्रासाची दखल घेवून अॅड. तुषार‎ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे‎ लेखी तक्रार करुन तसा ई-मेल‎ पाठवलेला होता. त्यानंतर संबंधित‎ ठेकेदाराने काल मध्यरात्री सिमेंटच्या‎ रस्त्यावर डांबराची बारीक फवारणी‎ करुन बारीक कच-खडी टाकली.‎ यामुळे आज उन्हामुळे रस्त्यावरील‎ डांबर वितळून ते गाड्यांच्या‎ टायरला लागत आहे. तर गरम ‎ ‎ डांबरामुळे दोन गाड्यांचे टायर‎ देखील फुटले आहे. तसेच पारोळा‎ ते कजगाव रस्त्यालगत असणाऱ्या ‎ ‎ कॉलन्यांमधील अॅप्रोच रोड ही‎ कनेक्ट केलेले नाहीत. मात्र, ‎ ‎ आमदारांच्या मालकीच्या पेट्रोल‎ पंपावर मात्र रोड अॅप्रोच केला आहे.‎

बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.‎ नव्याने रस्ता तयार करा‎ आगामी ८ दिवसात रस्त्याची‎ गुणवत्ता नियंत्रकामार्फत चौकशी‎ करावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदारास‎ हे काम करू देवू नये. तसेच निकृष्ट‎ दर्जाचे झालेले रस्त्याच्या‎ क्रॉंक्रिटीकरणाचे काम व त्यावर‎ पडलेले खड्डे एक ते दोन वर्ष‎ टिकेल, याची शाश्वती नाही.‎ त्यामुळे पुन्हा नव्याने काँक्रिटीकरण‎ करावे. तसेच काँक्रिटीकरण रस्त्यास‎ अॅप्रोच होणारे कॉलनीतील रस्ते‎ कनेक्ट करावे. संबंधित ठेकेदारास‎ काळ्या यादीत टाकून त्याच्याकडून‎ या बांधकामाचे टेंडर काढून घ्यावे,‎ अशी मागणी भाजपने निवेदनात‎ केली आहे.‎

रास्तारोको आंदोलनाचा दिला इशारा‎ याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसूर झाल्यास या रस्त्याच्या‎ निकृष्ट कामाबाबत जनआंदोलन उभे करुन रास्तारोको करण्यात येईल, असा‎ इशारा देण्यात आला आहे. या वेळी अॅड. अतुल मोरे, मुकुंदा चौधरी, जितेंद्र‎ चौधरी, सचिन गुजराथी, नरेंद्र साळी, समीर वैद्य, संकेत दाणेज, नरेंद्र‎ राजपूत, गणेश क्षत्रिय, बापू महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित‎ होते.‎

रास्तारोको आंदोलनाचा दिला इशारा‎ याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसूर झाल्यास या रस्त्याच्या‎ निकृष्ट कामाबाबत जनआंदोलन उभे करुन रास्तारोको करण्यात येईल, असा‎ इशारा देण्यात आला आहे. या वेळी अॅड. अतुल मोरे, मुकुंदा चौधरी, जितेंद्र‎ चौधरी, सचिन गुजराथी, नरेंद्र साळी, समीर वैद्य, संकेत दाणेज, नरेंद्र‎ राजपूत, गणेश क्षत्रिय, बापू महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित‎ होते.‎

नव्याने रस्ता तयार करा‎ आगामी ८ दिवसात रस्त्याची‎ गुणवत्ता नियंत्रकामार्फत चौकशी‎ करावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदारास‎ हे काम करू देवू नये. तसेच निकृष्ट‎ दर्जाचे झालेले रस्त्याच्या‎ क्रॉंक्रिटीकरणाचे काम व त्यावर‎ पडलेले खड्डे एक ते दोन वर्ष‎ टिकेल, याची शाश्वती नाही.‎ त्यामुळे पुन्हा नव्याने काँक्रिटीकरण‎ करावे. तसेच काँक्रिटीकरण रस्त्यास‎ अॅप्रोच होणारे कॉलनीतील रस्ते‎ कनेक्ट करावे. संबंधित ठेकेदारास‎ काळ्या यादीत टाकून त्याच्याकडून‎ या बांधकामाचे टेंडर काढून घ्यावे,‎ अशी मागणी भाजपने निवेदनात‎ केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...