आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट:जागृती मित्र मंडळ जिल्ह्यात प्रथम‎

भडगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या‎ राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ‎ स्पर्धेत येथील जागृती मित्र मंडळास‎ जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक‎ मिळाला आहे. मुंबई येथे राज्याचे‎ सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार‎ यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व रुपये‎ २५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन‎ नुकतेच दादर येथील रवींद्र नाट्य‎ मंदिर येथे मंडळास सन्मानित‎ करण्यात आले.‎

राज्य शासनातर्फे स्वातंत्र्याच्या‎ अमृत महोत्सवानिमित्त सर्वोत्कृष्ट‎ गणेश मंडळासाठी ही स्पर्धा‎ ठेवण्यात आली होती. जागृती मित्र‎ मंडळातर्फे गेल्या ४० वर्षांपासून‎ गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या‎ माध्यमातून विविध सामाजिक,‎ राष्ट्रीय, धार्मिक, शैक्षणिक‎ विषयांवर सजावटीद्वारे प्रबोधन‎ करण्यात येते. मंडळातर्फे विविध‎ समाजोपयोगी उपक्रम राबवले‎ जातात. २०१७ मध्ये घेतलेल्या‎ स्पर्धेतही मंडळाने नाशिक‎ विभागातून प्रथम क्रमांक पटकावला‎ होता. मुंबई येथील बक्षीस वितरण‎ कार्यक्रमास पु.ल. देशपांडे महाराष्ट्र‎ कला अकादमीचे प्रकल्प संचालक‎ संतोष रोकडे व सांस्कृतिक कार्य‎ विभाग सचिव सौरभ विजय हे‎ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...