आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जल्लोष; सामाजिक संस्था, महाविद्यालयांतर्फे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिव राज्याभिषेक दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यकर्त्यांतर्फे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिवसानिमित्त खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जे. बी. पटवर्धन, डॉ. जयेश गुजराथी, डॉ. विजय तुंटे, प्रा.डॉ. धनंजय चौधरी, ग्रंथपाल प्रा. दीपक पाटील, प्रा. सोनू राजपूत, रावसाहेब मैराळे, विजय ठाकरे, राकेश निळे, भटू चौधरी, देवेंद्र कांबळे, योगेश बोरसे, धनराज मोरे, नरेंद्र सातपुते, दुर्योधन नेरकर, उमाकांत ठाकूर, अजय साटोटे, कमलाकर पाटील, विनोद कोठावदे, सचिन खंडारे, संदेश शर्मा, पवन शर्मा, जयदेव पाटील, अंबादास चावरिया, महेश राजपूत, नितीन राजपूत, रोहित ठाकूर, नितीन बाविस्कर, पराग पाटील, मिलिंद नेवे, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शिरोडे यांनी महाविद्यालय प्रशासनातर्फे शिव स्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...