आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी:कोळपिंप्री सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे जयेशकुमार काटे ; मखमल फुला पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे जयेशकुमार प्रतापराव काटे तर व्हाइस चेअरमनपदी मखमल फुला पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी चेअरमन पदासाठी काटे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध घोषीत करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित संचालक प्रतापराव अर्जुन पाटील, भिकन सखाराम पाटील, सुभाष भीमराव पाटील, दीपक माधवराव काटे, ताथू सजन पाटील, सुनील कन्‍हैयालाल पाटील, पुंडलिक माधवराव पाटील, मोहन दगा निकम, सुनंदाबाई निशिकांत पाटील, सरलाबाई मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. जी. बारी यांनी काम पाहिले त्यांना सचिव युवराज पाटील यांनी सहकार्य केले. या वेळी माजी चेअरमन प्रफुल्ल काटे, माजी चेअरमन गिरीश काटे, प्रदीप काटे, प्रवीण काटे, प्रशांत काटे, मनोहर पवार, बापूराव पाटील, विजयकुमार काटे, कैलास पाटील, मेघराज काटे, अशोक काटे, प्रकाश काटे, गजानन काटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...