आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त सीईटी:इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषीची संयुक्त सीईटी ५ ते १८ ऑगस्टदरम्यान

चालीसगांवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी शाखा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असते. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी ही संयुक्त परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी-सीईटी दोन टप्प्यांत होणार असून, या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानुसार पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या परीक्षा ५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होतील. अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) आणि कृषी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी आवश्यक असते. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी संयुक्तरीत्या एमएचटी-सीईटी घेतली जाते. पीसीएम ग्रुपची परीक्षा ५ ते १० ऑगस्ट, तर पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा ११ ते १८ ऑगस्ट या कालावधीत होईल. सीईटीनंतर कॅप राउंड प्रक्रियेद्वारे प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...