आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीचा सराव.‎:ग्रामीण भागात वाढतेय कबड्डीची क्रेज‎

डोळंबा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्याच्या टोकांवर असलेलं‎ डोळंबा गावात दररोज मुलं करत आहे ‎कबड्डीचा सराव. स्वखर्चाने व अंगमेहनतीने बनवला लाल मातीचा ग्राउंड कबड्डीचे ‎ ‎ उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते किशोर‎ जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष दिनेश पतंगे, ‎काँग्रेसचे अनुसूचित जाती तालुका उपाध्यक्ष ‎ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते.‎

संघाचे पंकज पारधी,विजय‎ जाधव,कृष्णा चव्हाण,मिलिंद बरडे,रोहित ‎राठोड,चेतन गरिबे, .सावन चापले, मोनिस ‎ ‎ हुसेन,सुबोध भवरे,संघर्ष. बरडे,राजू धनगर, निर्मिक ब्राम्हने, गणेश चव्हाण या‎ कबड्डीसाठी डोळंबा येथील युवकांनी अथांग‎ परिश्रम घेतले. ब्रिटिशांनी भारतात‎ आणलेला क्रिकेट आज लोकप्रियतेच्या महा‎ शिखरावर आहे. मर्दानी खेळांची मजाच‎ न्यारी आजच्या काळात जिथे क्रिकेटला‎ अति महत्त्व दिलं जातंय, तिथं कबड्डी‎ सारख्या मैदानी खेळांना एवढं मोठं‎‎ व्यासपीठ मिळतंय हे अभिमानास्पद‎ आहे.कबड्डी या खेळाचाही लाखो संख्येने‎ प्रेक्षकवर्ग आहे. कबड्डी हा आपल्या‎ मातीतला, हक्काचा खेळ आहे.

प्रो‎ कबड्डीचा खूप मोठा चाहतावर्ग आता ग्रामीण‎ भागातहीवाढतानापहायला मिळतआहे.‎ क्रिकेटपेक्षाही कबड्डीचे सामने अगदी‎ आवडीने पाहणारे आहे. कारण या खेळात‎ जो मर्दानीपणा आहे तो कुठल्याही खेळात‎ नाही. अनुप कुमार, मनजित छिल्लर‎ यांसारख्या खरंच गुणी खेळाडूंना या खेळाने‎ जगासमोर आणलं. आता ग्रामीण भागातूनही‎ एखादा खेळाडू तयार होऊन जगाच्या‎ पाठीवर आपल्या डोळंबा गावाचे नावं‎ लौकिक कराल अशी अपेक्षा नीलेश जाधव‎ यांनी व्यक्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...