आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखान्देशात कानबाई उत्सव महत्त्वपूर्ण सण मानला जातो. शनिवारी भाजी-भाकरीचे रोट झाले असून रविवारी सायंकाळी कानबाई मातेची स्थापना करण्यात येईल. तर विधिवत मांडणी झाल्यावर रोट पूजन करण्यात येईल.
या उत्सवासाठी परगावी रोजगार, नोकरीसाठी गेलेले कुटुंबीय परत आलेले आहेत. शनिवारी भाजी- भाकरीचे रोट झाले. रविवारी कानबाई मातेचे विधिवत मांडणी करून सायंकाळी विधिवत पूजा केली जाणार आहे. यानंतर सोमवारी कानबाई मातेचे विसर्जन केले जाईल. कानबाई मातेच्या उत्सवासाठी अनेक प्रकारचे रोषणाईसह विशिष्ट प्रकारचे सुशोभीकरण केले जात आहे. कानबाईसाठी आंब्याचे तोरण, नारळ, केळीचे खांब, झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवले आहे. सोमवारी सकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. कानबाई उत्सवानिमित्त ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. दरम्यान, खान्देशात कानबाई तसेच रोट या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी हा उत्सव भक्तिभावाने साजरा होतो.
कानबाई मातेची मांडणी
कानबाईच्या मांडणीच्या दिवशी परनून आणलेले नारळ धुऊन घेतात. त्यालाच नथ, डोळे बसवून इतर पारंपारिक दागिने घातले जातात. केळीचे व कन्हेरचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवला जातो. कलशावर गळ्यातील हार, मनी, मंगळसूत्र चढवले जाते. चारही बाजूने शेवंतीची वेणी व ओढणी लावली जाते. ही पूजा मांडल्यावर आरती आणि नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य काशाच्या ताटात ठेवून देवीला ओवाळतात. ज्येष्ठांना हा मान असतो. त्यानंतर रात्री जागरण केले जाते. फुगड्या खेळून गाणी म्हटली जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कानबाईचे विसर्जन हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.