आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक:कन्नड घाट अपघातांचा घाट; 3 महिन्यांत 5 मोठे अपघात, ति‍घांनी जीव गमावला, 4 जण झाले जखमी

चाळीसगाव / उमेश बर्गे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड घाट अपघातांचा घाट बनला आहे. पावसाळ्यात ८ माेठ्या दरडी कोसळल्यानंतर सलग अडीच महिने या घाटाची दुरुस्ती करण्यात आली व वाहतुकीसाठी सज्ज झाला. अपघातांचे प्रमाण नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. उलट रस्ता पूर्वीपेक्षा अधिक गुळगुळीत झाल्याने अवजड वाहने सुसाट धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ३ महिन्यांत ५ मोठे अपघात झाले. त्यात तिघांना प्राण गमवावे लागले तर ४ जण जखमी झाले आहेत. अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणे, दिशादर्शक फलक, कठडे बसवल्यास अपघातांवर नियंत्रण येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कन्नड घाटात अपघातांची मालि‍का सुरूच
३१ आॅगस्टपासून घाट वाहतुकीसाठी बंद होता. दुरुस्तीनंतर ५ डिसेंबरपासून घाट अवजड वाहतुकीसाठी खुला झाला
आहे. अपघात मात्र थांबलेले नाहीत.
१८ जानेवारी - केमिकल सांडल्याने दुचाकी घसरून अनेक जखमी
८ फेब्रुवारी ब्रेक - निकामी होऊन ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला
२१ फेब्रुवारी ट्रक - ४०० फूट खोल दरीत कोसळून दोन ठार
२८ फेब्रुवारी - तीन वाहनांचा घाटात विचित्र अपघात
१३ मार्च - ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळून एक ठार

- रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहने सुसाट धावतात. अवघड वळणांवर चालकांचे नियंत्रण सुटते अन् ट्रक खोल दरीत कोसळतात. घाटात अवजड ट्रक, कंटेनर व ट्रेलरची वाहतूकही वाढली आहे. - घाटातील दिशादर्शक फलकही गायब झाल्याने वळण, वेगमर्यादा, चढ-उतार, अरूंद रस्ता याचा अंदाज चालकांना येत नाही. तसेच संरक्षक कठडे, साईड बॅरिकेड्स तुटले आहेत. - घाटात काही ठिकाणी रस्ता अरुंद असून अत्यंत निमुळती वळणे आहेत. त्याचा चालकांना अंदाज येत नसल्याने ट्रक दरीत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. - वाहन चालकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. अवघड वळणांवरही ओव्हरटेकचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

उत्तर अन् दक्षिणेकडील राज्यांचे प्रवेशद्वार
धुळे-सोलापूर मार्गावरील हा घाट उत्तर व दक्षिणेकडील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. उत्तर व दक्षिण या
दोन्ही विभागांचे हे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस हजारो वाहनांची दररोज ये-जा सुरू असते.

रेडियम, साइडपट्ट्यांचे काम ८ दिवसांत होणार
घाटातील रस्त्यावर साइडपट्टे मारणे, रेडियम लावणे व कठडे तयार करण्याची कामे सुरू आहेत. आठ दिवसांत ती पूर्ण
होतील. तसेच महामार्ग प्राधिकरणाने घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागा वन विभागाकडून घेऊन त्या
बदल्यात पर्यायी जागा वन विभागाला द्यावी. चौपदरीकरणास जमीन उपलब्ध झाल्यास घाटातील वाहतुकीची समस्या
सुटेल तसेच जंगलातून वाहतूक वळवणे हादेखील चांगला पर्याय आहे. - राज पुन्शी, कंत्राटदार, संत सतरामदास
इन्फ्रा.कंपनी

बातम्या आणखी आहेत...