आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कन्नड घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार, तर क्लीनर बचावला

चाळीसगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाकडाने भरलेला ट्रक कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक लाकडाखाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर ट्रक दरीत कोसळताना क्लीनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. कन्नड घाटात मोठा महादेव मंदिराजवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. महामार्ग पाेलिसांनी शाेध माेहीम राबवल्यानंतर सकाळी चालकाचा मृतदेह हाती लागला.

आंध्र प्रदेशकडून चाळीसगावच्या दिशेने लाकडाने भरलेला ट्रक (एपी- १६, पीजी- ३५५३) येत होता. हा ट्रक कन्नड घाटात खाली उतरत असताना मोठा महादेव मंदिराजवळ ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालक रामू सत्यम (वय ४१, रा. सदाशिवणी पालण, ता. सत्यमपल्ली तेलंगणा) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक लाकडांसह १०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळत असताना क्लीनरने उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला. मात्र,चालक रामू सत्यम हा ट्रकसह खाेल दरीत काेसळला.

रात्री राबवली शाेधमाेहीम; सकाळी मिळाला मृतदेह
घाटात ट्रक कोसळल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी क्लीनरला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तर जवळच्या हॉटेल चालकांकडून दोरखंड मागवून रात्री अंधारात खोल दरीत उतरून चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ज्या दरीत ट्रक कोसळला हाेता. तेथे चालकाचा शोध घेतला. चालक रामू सत्यम हा ट्रकच्या लाकडांखाली दाबल्याने ताे मृत अवस्थेत मिळून आला. क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह दरीतून काढून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

बातम्या आणखी आहेत...