आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकीवर देशभ्रमणासाठी निघालेला आंध्रप्रदेशातील नेल्लूर येथील व्यंकटा कार्तिक (वय २९) हा युवक, शुक्रवारी (दि.२९) पारोळ्यात पोहोचला. १४ फेब्रुवारीपासून त्याने प्रवासाला सुरूवात केली आहे. आतापर्यंत १३५ दिवसांत साडेचार हजार किमी अंतर कापल्याचे त्याने सांगितले.
आतापर्यंत कार्तिकने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रवास केला आहे. महाराष्ट्रात आणखी पाच दिवस तो विविध ठिकाणांना भेट देणार आहे. आपला अनुभव सांगताना कार्तिक म्हणाला की, प्रवासादरम्यान प्रत्येक राज्यात चांगला अनुभव येत आहे. स्थानिक नागरिक विचारपूस करतात, राहण्यासाठी मंदिर, गुरुद्वारा, शाळांमध्ये व्यवस्था करतात. मनातील तणाव दूर होऊन देशातील विविध धार्मिक, ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी दुचाकीवर भ्रमंतीला निघाल्याचे त्याने सांगितले. दररोज ४०० किमी प्रवास करत असून, आजवर दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे त्याने सांगितले. पारोळ्याहून तो पुढे जळगावकडे रवाना झाला. पाराेळा शहरात माजी नगरसेवक राजेंद्र पाटील, संजय पाटील, शिवदास चौधरी, मधुकर पाखले त्याचप्रमाणे भैय्या पवार यांनी व्यंकटा कार्तिक याचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.