आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठेकेदाराने केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी ११ हजारांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील खर्डी येथील ग्रामसेवकाला धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
खर्डी येथील एका तक्रारदार खासगी बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय करतात. वर्डी ग्रामपंचायतीत १५व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत बांधकामाचे काम जळगाव येथील एका शासकीय ठेकेदाराने ३१ डिसेंबर २०२१ रोजी घेतले आहे. हे काम तक्रारदारांनी त्या ठेकेदारकडून १०० रुपयांचे स्टॅम पेपर करुन ११ फेब्रुवारी २०२२ रोजी करारनामा केला होता. कराराप्रमाणे तक्रारदारांनी घेतलेले काम पूर्ण केले आहे. या कामाचे बिल शासकीय ठेकेदाराच्या नावे मिळण्यासाठी तक्रारदाराने ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे यांची भेट घेतली.
त्यांनी तक्रारदारांकडे ५ टक्के याप्रमाणे १२ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. या संदर्भात खर्डी येथील तक्रारदारांनी धुळे येथील अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाला संपर्क केला. दरम्यान, ग्राम विकास अधिकारी भगवान यहिदे (वय ५८) यांनी तक्रारदाराकडे १२ हजार ५०० रुपयांची पंचासमोर मागणी केली. तडजोड-अंती ११ हजारांची लाच स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्डी येथील ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे यांना रंगेहाथ अटक केली आहे. ग्राम विकास अधिकारी भगवान यहिदे हे एका महिन्यात अर्थात ३० जूनला निवृत्त होणार होते. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात धुळे येथील पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.