आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:किसानच्या विद्यार्थ्यांनी‎ बँकभेट देत जाणून घेतली‎ कामकाजाची माहिती‎

पाराेळा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील किसान‎ महाविद्यालयातील वाणिज्य‎ शाखेच्या विद्यार्थ्यांनी ४ राेजी‎ शहरातील एचडीएफसी बँकेला भेट‎ दिली. या प्रसंगी बँकेचे मॅनेजर महेश‎ भावसार, जनसंपर्क अधिकारी‎ उमेशचंद्र वैद्य यांनी विद्यार्थ्यांना‎ बँकेची दैनंदिन कार्यप्रणाली, बँकिंग‎ व्यवहार, ऑनलाइन बँकिंगसंदर्भात‎ मार्गदर्शन केले. या प्रत्यक्ष व्यवहार‎ करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे‎ प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना अनुभव‎ दिला. या प्रसंगी वाणिज्य विभागाचे‎ प्रा.डॉ. किरण पाटील, प्रा. प्रशांत‎ इंगोले, प्रा.नीलेश वळवी व वाणिज्य‎ शाखेचे ३१ विद्यार्थी उपस्थित होते.‎ प्राचार्य डाॅ.वाय.व्ही. पाटील,‎ उपप्राचार्य डाॅ.गुणवंत सोनवणे यांनी‎ उपक्रमाचे कौतुक केले.‎ अायक्यूएसी समन्वयक डॉ. पी. डी.‎ पाटील, प्रा. अनिल वाघमारे, प्रा.‎ नीलेश वळवी यांनी व्यवस्था केली.‎

बातम्या आणखी आहेत...