आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:कृउबास निवडणूक 15 मार्चपर्यंत स्थगित

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १५ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नव्याने ग्रामपंचायतीत निवडून येणाऱ्या सदस्यांना देखील बाजार समितीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३च्या कलम १३ (१) ‘अ’मध्ये सुधारणा करून बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना संचालक म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्याबाबत २२ नोव्हेंबरला अध्यादेश प्रकाशित केला होता.

तसेच बाजार समितीत ४ सदस्य ग्रामपंचायत सदस्यांमधून तर ११ सदस्य विकास सोसायट्यामधून असे १५ सदस्य शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. ग्रामपंचायत सदस्य व कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय संस्था हे बाजार समितीचे मतदार असतात. शासनाने ९ नोव्हेंबरला राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

त्यामुळे या ग्रामपंचायतीत निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट होऊन नवीन मतदार यादी तयार होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी, अशी शासनाची भूमिका आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मंगेश पाटील व न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांनी ३० नोव्हेंबरला बाजार समिती निवडणुकांसाठी १५ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...