आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगिरीची दखल:पाचोरा, अमळनेर तहसीलदारांनी उल्लेखनीय कार्य केल्याने गौरव

पाचोरा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्टला महसूल दिन साजरा करण्यात आला. सन २०२१/२२ मधे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पाचोरा येथील तहसीलदार कैलास चावडे, अमळनेर येथील तहसीलदार मिलिंद वाघ, भडगाव येथील अव्वल कारकून दिलिप राजपूत, उत्कृष्ट शिपाई गोपीचंद महाजन, तर पाचोरा विभागात उत्कृष्ट तहसीलदार मुकेश हिवाळे (भडगाव), पाचोरा येथील निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, भडगाव येथील निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांना सन्मानित केले. तहसीलदार कैलास चावडे यांनी त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभा चावडे यांच्यासह पुरस्कार स्विकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक एम.पी.पवार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन साजरा करण्यात आला. नायब तहसीलदार रणजित पाटील, भागवत पाटील, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.डी.पाटील, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब नेटके, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष नदिम शेख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...