आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:वीटभट्टी मालकाने केलेल्या मारहाणीत मजुराचा मृत्यू

पहुर/जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराला मालक हर्षल भरत पवार यांनी गुरुवारी जबर मारहाण केली. या मारहाणीत संबंधित मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोद्री येथील रहिवासी लहानू चांदखाँ तडवी हा कुटुंबासह तोंडापूर ढालसिंगी रस्त्यावरील हर्षल पवार यांच्या वीट भट्टीवर मजूर म्हणून काम करतो. गुरुवारी तडवी व त्याच्या पत्नी-मध्ये वाद झाले. त्यावेळी मालक पवार यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मालकाचेही न ऐकल्याने संतप्त झाल्याने पवार यांनी त्यास काठीने मारहाले. या मारहाणीत त्यांच्या मागील मेंदूस मार लागला. त्यामुळे ते जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तडवी हे हालचाल करत नसल्याचे पाहून मालक पवार यांनी त्यांना तोंडापूर येथे रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने पवार यांचे दाबे दणाणले. यामुळे भयभीत होऊन पवार यांनी त्यांचा मृतदेह पुन्हा वीट भट्टीजवळ आणून ठेवल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...