आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमातून उपस्थितांना दिला भूतदयेचा संदेश:एरंडोल येथील शेतकरी कुटुंबातील लाडक्या लक्ष्मी गायीचे डोहाळे जेवण

एरंडोल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील देवरे कुटुंबियांनी ४ रोजी लक्ष्मी गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी सुवासिनींना निमंत्रित केले होते. तर जळगाच्या भजनी मंडळाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. शेतकरी दिनानाथ रामदास देवरे व त्यांच्या कुटुंबियांनी ‘लक्ष्मी’ गायीचा ओटीभरण सोहळा करण्याचा संकल्प केला होता. गायीच्या डोहाळे जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी सुवासिनींची गर्दी झाली होती. देवरे परीवाराने पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला. देवरे कुटुंबियांनी वर्षभरापूर्वी ही गाय विकत आणली. गो रक्षणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. दिनानाथ देवरे, कमलाक्षी देवरे, गायत्री देवरे, भरत दुसाने, रेणुका दुसाने, योगेश दुसाने आदींनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे कौतुक झाले.

५६ भोग नैवेद्य... लक्ष्मी गायीच्या ओटीभरणासाठी हिरवी साडी, फुलांचा हार, पाच फळे आणि ओटी भरल्यानंतर ५६ भोगांचा नैवेद्यही लक्ष्मीला दिला. आदर्श भजनी मंडळाने भजने, भारूडे सादर करुन रंगण आणली.

बातम्या आणखी आहेत...