आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळक्याचा वऱ्हाडींवर हल्ला:पावणे तीन लाखांचे दागिने घटनेत लंपास; शिवापूर शिवारात हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून झाला वाद

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिवापूर येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलांकडे पाहून का नाचतो, असे विचारल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यात जमावाने वऱ्हाडींवर हल्ला करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत महिलांच्या गळ्यातील सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने ओढून नेले.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार शिवापूर येथील १६ जणांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. पिंपरखेड तांडा येथील राहुल पंडित चव्हाण याच्या लग्नानिमित्त त्याच्या शिवापूर शिवारातील शेतात गुरुवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमात वऱ्हाडी नृत्य करत होते. त्याठिकाणी शिवापूर येथील विनोद पवार हा त्याच्या चार मित्रांसमवेत नाचण्यास आला. ते स्त्रियांकडे पाहून इशारे करून नाचत होते. याबाबत फिर्यादी महिलेच्या पतीने त्यांना हटकल्याने राग येऊन पवार याने फिर्यादीच्या पतीस शिवीगाळ व लाथ मारून खाली पाडले. यावेळी इतरांमुळे ते रागाने निघून गेले.

त्यानंतर वऱ्हाडी नाचगाणे बंद करून दुसऱ्या दिवशीचे नियोजन करत असताना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास विनोद पवार हा १५ ते १६ लोकांना घेऊन तेथे आला. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या, गज व चेन आदी साहित्य होते. त्यांनी वऱ्हाडींना मारण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात प्रवीण चव्हाण याच्या पाठीस, पायांना काठींचा मार बसल्याने जखमा झाल्या. तर विनोद पवारने फिर्यादी महिलेचा हात धरून मनगटावर काठीने मारून दुखापत केली.

पवारसह इतरांनी फिर्यादी महिलेस घेरून त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची पोत, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, डाव्या कानातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे जबरीने तोडून नेले. नणंदेचे हात धरून ५ तोळ्याची माळ जबरीने तोडून नेली. यावेळी जमावाने अनेकांना मारहाण केली. वऱ्हाडीतील काही लोक धावले व त्यांनी मारहाण करणाऱ्यांना आवरल्याने ते शिवीगाळ करत निघून गेला. यात २ लाख ७५ हजार रूपये किंमतीचे दागिने जमावाने जबरीने अंगावरून ओढून नेले.

बातम्या आणखी आहेत...