आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:हातेड येथून सात‎ लाखांचा ऐवज‎ केला लंपास‎

चोपडा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हातेड खुर्द‎ येथे कामानिमित्त बाहेरगावी‎ गेलेल्या निवृत्त शिक्षकाच्या‎ बंद घराचे कुलूप ताेडून‎ अज्ञात चोरट्यांनी रोख‎ रकमेसह सोन्याचे दागिने‎ असा ७ लाखांचा ऐवज‎ लंपास केल्याची घटना ४‎ रोजी मध्यरात्री घडली.‎ तालुक्यातील हातेड खुर्द‎ येथील निवृत्त शिक्षक‎ शिवाजीराव पाटील (वय‎ ६२) हे पत्नी सुशीलाबाई‎ पाटील, आई अंजनाबाई‎ पाटील हे रुग्णालयाच्या‎ कामानिमित्त २६‎ फेब्रुवारीपासून धुळे येथे‎ मुलाकडे राहत आहेत.‎ दरम्यान, ४ राेजी सकाळी‎ ११ वाजेच्या सुमारास हातेड‎ येथून त्यांचा मुलगा तुषार‎ पाटील यांना फोन आला‎ की, तुमचे घराचे कुलूप‎ अज्ञात चोरट्यांनी तोडले‎ आहे.

त्यानंतर शिवाजी‎ पाटील हे हातेड खुर्द येथे‎ घरी आले. घरातील‎ साहित्याची पाहणी केली‎ असता कपाटाचे कुलूप‎ तोडून ५ लाख २० हजार‎ रोख, १ लाख ५० हजार‎ किंमतीची २ तोळ्यांची‎ सोन्याची चैन, १ तोळ्याची‎ सोन्याची अंगठी असा‎ एकूण ६ लाख ७० हजारांचा‎ मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी‎ लंपास केल्याचे लक्षात‎ आले. ही माहिती ग्रामीण‎ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर‎ उपविभागीय पाेलिस‎ अधिकारी कृषिकेश रावले,‎ पोलिस निरीक्षक कावेरी‎ कमलाकर यांनी भेट दिली.‎

बातम्या आणखी आहेत...