आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान:जखमी काळवीटला दिले जीवदान ; पाणी पाजून उपचारासाठी वन विभागाकडे सोपवले

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुंगसे गावानजीक शेतात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास काळवीटला कुत्र्यांनी हल्ला करुन जखमी केले होते. ग्रामस्थांनी या जखमी काळवीटला पाणी पाजून उपचारासाठी वन विभागाकडे सोपवल्याने त्याचे प्राण वाचले. जखमी काळवीटला मुंगसे येथील ग्रामस्थांनी पाणी पाजले नंतर पारोळा येथील वनपाल दीपक पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील व पारधी यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी तातडीने जखमी काळवीटला अमळनेर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवले. त्यांनी उपचार केले. वेळीच उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले. त्यासाठी मुंगसे येथील भानुदास पाटील, पोलिस पाटील भरत निकुंभ, लिलाधर पाटील, भटू कोळी आदींनी धडपड केली.

बातम्या आणखी आहेत...