आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारदार शस्त्र:प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला जन्मठेप ; अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे विडी न दिल्याचा राग आल्याने, आरोपीने फिर्यादीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले होते. या गुन्ह्यातील आरोपीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.२६ जानेवारी २०२१ रोजी रात्री बुधगाव येथे देविदास दौलत कोळी यांच्या दुकानावर बिडी घेण्यासाठी फिर्यादी ज्ञानेश्वर भीमराव शिरसाठ (वय ४५, रा. बुधगाव) हे गेले होते. त्यावेळी आरोपी अनिल उर्फ नानाभाऊ रामसिंग भिल (रा.बुधगाव) याने दारूच्या नशेत शिरसाठ यांच्याकडे बिडी मागितली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आरोपीने शिरसाठ यांच्या मानेवर वार केले. यावेळी आरोपी भिल अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. ग्रामस्थांनी जखमी शिरसाठ यांना दवाखान्यात दाखल केले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मानेवर पडले ३१ टाके फिर्यादीच्या मानेवर ३१ टाके घालण्यात आले होते. हा खटला जिल्हा न्यायाधीश पी.आर.चौधरी यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील किशोर बागुल यांनी ७ साक्षीदार तपासले. ज आरोपीची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला शासनाने वकील दिला होता. आर्थिक परिस्थिती नसल्याने दंडही नाकारला होता. कलम ३०७ नुसार त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. व्हिसीद्वारे जेलमध्ये शिक्षा सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...