आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:साहित्य, राजकारण म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू; अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

एरंडोल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय पक्षांचे पदाधिकारी साहित्यिक असल्यामुळे साहित्य आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले. औदुंबर साहित्य रसिक मंचतर्फे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना गुजराथी यांनी तोंडातून निघालेला शब्द, बंदुकीतून निघालेली गोळी आणि धनुष्यातून निघालेला बाण परत येत नसल्यामुळे सर्वांनी बोलताना शब्द जपून वापरण्याचे आवाहन केले. शब्दांमुळे मित्र जोडले जात असल्याचे सांगितले. शासनाने कितीही अनुदान दिले तरी शेतकरी जगू शकणार नाही तर साहित्यिक, समाज आणि वैज्ञानिकांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रशांत तिवारी, डॉ.फरहाज बोहरी, डॉ.मनोज देशपांडे, सुनील भंगाळे, सुभाष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पद्मश्री भंवरलाल जैन लिखित ‘ती आणि मी’ या पुस्तकाबद्दल ज्ञानेश्वर शेंडे यांनी माहिती दिली. औदुंबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष अॅड.मोहन शुक्ला यांनी संमेलन यशस्वी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अनिल लोहार, अनुराग वाजपेयी, डॉ.के.अ.बोहरी, किर्गीस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, उद्योजक पंकज काबरे, मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, आनंद दाभाडे उपस्थित होते. प्रा.वा.ना.आंधळे, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, कार्याध्यक्ष प्रवीण महाजन, जाकीर सय्यद, संदीप ठाकूर, भीमराव सोनावणे, पी,जी.चौधरी, निंबा बडगुजर, उद्योजक विजय जाधव, भीमराव सोनावणे, माधुरी कुलकर्णी यांनी सहकार्य केले. समारोपप्रसंगी हास्य कलावंत बंडा जोशी यांच्या कार्यक्रमास प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...