आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सहा दशके रहिवास, तेथेच घरासाठी जागा द्या ; मागणीसाठी अमळनेर नगरपालिकेवर मोर्चा

अमळनेर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील फायनल प्लॉट १२३ मधील रहिवासी अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेदरम्यान, पांचाळ समाजाच्या एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त पांचाळ बांधवांनी व इतर अतिक्रमित कुटुंबियांनी याच जागेत रहिवासासाठी घरे मिळावीत यासह इतर मागण्यांसाठी पालिकेवर सोमवारी मोर्चा काढला.

काही मागण्यांबाबत विचार करू, मात्र तातडीने म्हाडा कॉलनीत दिलेल्या घरात स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी यावेळी झालेल्या बैठकीत केले. सोमवारी सकाळी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी काही प्रतिनिधींना दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी त्वरित घरे खाली करून म्हाडा कॉलनीत स्थलांतरित व्हावे, असे आवाहन सीओंनी केल्याने आंदोलक माघारी फिरले.

अशा आहेत मागण्या... ६० वर्षांपासून या जागेवर रहिवासी असणाऱ्यांना त्याच ठिकाणी घरासाठी आणि व्यवसायासाठी जागा मिळावी, मृत शोभाबाई यांच्या वारसाला नगरपरिषदेत नोकरी द्यावी, अतिक्रमण पथक प्रमुख व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा.

बातम्या आणखी आहेत...