आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर प्रश्न:अमळनेरात 14 जीर्ण इमारतीत‎ रहिवास धोक्याचा, तरी दुर्लक्षच‎

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ शहरातील १४ धोकेदायक जीर्ण‎ इमारतींची पालिकेकडे नोंद आहे.‎ भुसावळात झालेल्या भूकंपाच्या‎ पार्श्वभूमीवर या इमारतींच्या सुरक्षेचा‎ मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.‎ त्यापैकी काही इमारतींमध्ये रहिवास‎ असून, काही इमारतींच्या‎ तळमजल्यावर दुकाने आहेत.‎ त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न‎ निर्माण झाला आहे. पालिकेने‎ सुरक्षेच्या कारणास्तव या जीर्ण‎ इमारतीच्या मालकांना धोक्याचा‎ इशारा देणारी नोटीस दिली आहे.‎ तसेच इमारत रिकामी करण्याची‎ सूचनाही दिली आहे. मात्र, रहिवासी‎ आणि दुकानदारांनी त्याकडे दुर्लक्ष‎ केले आहे.‎ अमळनेरात पडक्या आणि‎ जीर्णावस्थेतील १४ इमारतींचा‎ आकडा पालिकेने जाहीर केला‎ आहे. या इमारतीच्या मालकांना‎ वारंवार सूचना देऊनही रहिवासी‎ आपले घर सोडण्याच्या तयारीत‎ नाहीत.

गेल्या अनेक वर्षांपासून रहिवास‎ करणाऱ्या या नागरीकांचा जीव धोक्यात‎ आहे. या इमारतींमुळे शेजारी घरे आणि‎ इमारतींनाही धोका पोहोचण्याची भीती‎ आहे. पावसाळ्यात जीर्ण इमारती‎ अधिकच धोकेदायक ठरतात. त्यामुळे‎ वेळीच दखल घेऊन संबंधितांनी‎ सुरक्षेसाठी स्थलांतर करणे गरजेचे आहे.‎ अमळनेरात १४ जीर्ण इमारती धोकेदायक बनल्या‎ आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.‎

जबाबदारी संबंधितांची
‎पालिका दरवर्षी जून महिन्यात जीर्ण‎ इमारतीतीलरहिवा सी, भाडेकरू व इमारत‎ मालकांना नोटीस बजावते. परंतु या बाबीकडे‎ मालक आणि रहिवासी दुर्लक्ष करतात. इमारती‎ खाली करण्याचे काम मूळ मालकांचे आहे.‎ आपत्ती ओढवल्यास ते च जबाबदार असतील.‎ - प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर‎

पालिकेने केले‎ सर्वेक्षण‎
शहरात धोक्याही पातळी‎ ओलांडलेल्या जुन्या पडाऊ‎ इमारतींची संख्या१४ आहे.‎ त्यापैकी अनेक इमारतींमध्ये‎ अजूनही रहिवास होत आहे.‎ पालिका दरवर्षी जून‎ महिन्यात जीर्ण‎ इमारतींमधील रहिवासी‎ आणि मालकांना नोटीस‎ बजावते. मात्र या नोटीसचा‎ रहिवाशांना फारसा फरक‎ पडत नाही. याबाबत‎ पालिकेने सर्व्हेक्षण करून‎ १४ इमारती धोकेदायक‎ असल्याचा निष्कर्ष काढला‎ आहे. मात्र, अद्यापही हा‎ प्रश्न प्रलंबित आहे.‎

बातम्या आणखी आहेत...