आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम रेल्वेत वलसाड लॉबी येथे कार्यरत सुवर्णा तायडे, यांना पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये लोकोपायलट पदावर बढती मिळाली आहे. जळगाव येथील सासर असलेल्या तायडे यांच्या कामगिरीमुळे त्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या व रतलामचे माहेर असलेल्या सुवर्णा तायडे यांनी, कठीण परिश्रम घेत इलेट्रॉनिक्स कम्युनिकेशनमधून इंजीनिअरींगची पदवी घेतली. त्यानंतर एम.टेक.चे शिक्षण घेत असताना त्यांनी रेल्वेच्या परिक्षाही दिल्या. त्यात त्यांना यश मिळाल्यानंतर २०१६ मध्ये मुंबई डिव्हीजनमध्ये वलसाड येथे असिस्टंट लोको पायलट या पदावर त्या रूजू झाल्या. त्यानंतर या पदावर सहा वर्षे कठोर मेहनत केल्यानंतर २४ जुलै रोजी त्यांना पदोन्नती मिळाली. त्या वलसाड लॉबीत लोको पायलट म्हणून नियुक्त झाल्या आहेत. त्याचे पती राकेश हिरामण तायडे हे सुध्दा वलसाड येथे रसायन व धातूकर्मी अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते मूळचे जळगावचे असून त्यांचे वडील, निवृत्त सहा. फौजदार हिरामण तायडे हे चाळीसगावात कार्यरत होते.
जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला
देशाच्या पहिल्या महिला रेल्वे चालक सातारा येथील सुरेखा यादव आहेत. त्या १९८८ मध्ये भारतीय रेल्वेत चालक म्हणून रूजू झाल्या होत्या. त्यांची पहिली नियुक्ती छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली होती. त्यानंतर कमी प्रमाणात महिला रेल्वे चालक पदावर पोहोचल्या आहेत. त्यात आता जळगावच्या सुनबाई सुवर्णा तायडे यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्यांची कामगिरी महिलांसाठी अभिमानास्पद, तसेच जिल्ह्याचा गौरव वाढवणारी आहे.
प्रामाणिक प्रयत्नांचे फळ
महिला खूप मेहनती आणि कर्तृत्ववान असतात. त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठेल. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळते.
सुवर्णा तायडे, लोको पायलट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.