आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील लाेणी बुद्रुक व लाेणी सिम येथील ग्रामपंचायतीसाठी ५ राेजी शांततेत मतमोजणी झाली. या निवडणुकीत लाेणी बुद्रुक येथील दाेन्ही पॅनलच्या उमेदवारांनी समान जागांवर विजय मिळवला आहे.
तालुक्यातील लोणी बुद्रुक व लोणी सिम ग्रामपंचायतीची ५ रोजी मतमोजणी तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार बी. आर. शिंदे, मंडळ अधिकारी व्ही. एन. राठोड, शहर तलाठी निशिकांत पाटील, एस. पी. पाटील, ए. यु. पाटील, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या उपस्थित करण्यात आली. या निवडणुकीत लोणी बुद्रुक येथील विजयी उमेदवारांमध्ये अनिल भाईदास अहिरे (१५८ मते), केवलबाई नाना पाटील (१४५), मीनाबाई मनोहर पाटील (२०४), रत्नाबाई रमेश पाटील (२३२), शशिकांत राघो पाटील (१०३), वंदनाबाई वसंत केदार (९०) तर लोणी सिम येथील निवडणुकीत योजना मगन पाटील, अन्नपूर्णा पुंजू पाटील, कैलास नीलकंठ पाटील, कोकिळा रावण पाटील हे विजयी झाले आहेत. तर लोणी बुद्रुकमध्ये २, सिममध्ये २ तर लोणी खुर्दमध्ये सर्वच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. दरम्यान, लोणी सिममध्ये डॉ. कैलास पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. तर लोणी बुद्रुकमध्ये दोन्ही गटास समान जागा मिळाल्या तरी सतीश पाटील यांच्या पॅनलने दमदार लढत दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.