आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची लूट:कापूस खरेदी वजन काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची लूट

पाचोरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यासह जिल्ह्यातील खासगी कापूस व्यापारी ताण काटा, वजन काटा म्हणजे (धडी ५ कि.ग्रॅ.,१० कि.ग्रॅ.,२० कि.ग्रॅ.) लोखंडी वजनाची मापे व इलेक्ट्रॉनिक काट्याचा सर्रास वापर करत अाहेत. त्यात हेराफेरी करून कमी वजनात, मापात जास्तीत जास्त कापूस कसा घेता येईल, यासाठी काही व्यापाऱ्यांनी चलाखी करत वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. राज्य शासनाने अद्याप शासकीय कापूस केंद्र सुरू केले नसल्याने खेडा खरेदीदार सात ते साडेसात हजार रुपये दराने कापूस खरेदी करत आहेत.

गावागावातून शेतकरी वर्गातून चर्चा ऐकायला मिळत आहे. कमी वजनात जास्त कापूस मोजून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काट्याची सेटिंग बदलवून तर काहींनी चावीच्या किचनची डिझाईन बनवून त्यात छुपा रिमोट कंट्रोल बसवला अाहे. कापूस मोजताना शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने रिमोट कंट्रोलद्वारे वजन, मापात हेराफेरी करतात. तसेच घडी काट्याने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाच कि.ग्रॅ., दहा कि.ग्रॅ. व २० कि.ग्रॅ. वजनाच्या लोखंडी मापात वजन वाढवून घेण्यासाठी मापाच्या आतील पोकळीत हुशार कारागिरांच्या माध्यमातून लोखंड, किंवा शिसे भरुन वजन वाढवल्याची जाणीव काही सुज्ञ शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे.

असाच काटा सेटिंगचा गैरप्रकार ताण काट्यातही केला असून ताण काट्याच्या मध्ये असलेल्या काही स्प्रिंग काही ठिकाणी आतल्या आत बारीक तारेच्या साह्याने बांधून कमी वजनाच्या मोजमापात जास्तीत जास्त कापूस मोजून घेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने व्यापाऱ्यांना कापूस विकताना वजन माप तपासूनच कापूस विक्री करावी, अशी सूचना फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...