आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनिक प्रसंग:मॅम तुम्ही जाऊ नका; अन्यथा आम्ही शिकणार नाही, जळगावमध्ये बदली झालेल्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांचे आर्जव

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव तालुक्यातील गोंडगाव जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षिका संगीता पाटील यांची नुकतीच बढतीवर उपखेड (ता.चाळीसगाव) येथे बदली झाली. मात्र, विद्यार्थिप्रिय शिक्षका असलेल्या पाटील यांना शाळेतून निरोप देताना, विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. मॅम तुम्ही शाळा सोडून जाऊ नका, तुम्ही गेल्यावर आम्ही शिकणारच नाही, असे आर्जव विद्यार्थ्यांनी केले.

शिक्षिका संगीता पाटील यांची उपखेड येथे तातडीने बदली झाल्याचे कळताच, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही गहिवरले. शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तर हंबरडाच फोडला. सगळे विद्यार्थी ओक्साबोक्सी रडत असल्याने, अतिशय भावनिक प्रसंग गोंडगाव ग्रामस्थांनी अनुभवला. विद्यार्थी आणि शिक्षक याचे नाते किती अतूट असते, हे या प्रसंगाने अधोरेखित केले. शिक्षिका संगीता पाटील या मूळच्या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा पिराचे येथील रहिवासी आहेत. त्यांची एकूण १९ वर्षे सेवा झाली असून, पाटणा तांडा येथे सर्वप्रथम नियुक्ती झाली होती. २०१८ पासून ते गोंडगाव जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी शाळेत आमुलाग्र बदल घडवला, विद्यार्थ्यांना शिस्त लावली. त्यांच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. शालेय कामकाज सुरू असतानाच त्यांना अचानक समुपदेशनासाठी जळगाव येथे हजर राहण्याच्या सूचना मिळाल्या. त्यांच्या बदलीची वार्ता विद्यार्थ्यांच्या कानावर पडताच विद्यार्थी गहिवरले.

बातम्या आणखी आहेत...