आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थकांनी केला जल्लोष:जामनेर उपनगराध्यक्षपदी महेंद्र बाविस्कर बिनविरोध

जामनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक महेंद्र बाविस्कर यांचा एकच अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरुण शेवाळे यांनी महेंद्र बाविस्कर यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभागृहात जाहीर केले.

नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पिठासीन अधिकारी तहसीलदार अरुण शेवाळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रा.शरद पाटील, आतीष झाल्टे, जितेंद्र पाटील, अनिस शेख, नाजीम पार्टी, फारुख मण्यार, खलिल खान, कैलास नरवाडे, ज्योती पाटील, मंगला माळी, शितल सोनवणे, लिना पाटील, भगवान सोनवणे उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पालिकेवर भाजपची सत्ता आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून परिचीत असलेले महेंद्र बाविस्कर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याने स्वागत केले जात आहे. निवड झाल्यानंतर कार्यकर्ते व हितचिंतकांनी आतषबाजी करत गुलाल उधळला.

बातम्या आणखी आहेत...