आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गाळण बुद्रुक येथील २२ वर्षीय विवाहितेने घराच्या छताला दाेर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, मुलीचे निधन झाल्यानंतर घरी असलेले सासरे व नणंद हे पसार झाले. यामुळे तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकवले गेले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा संशय असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेचा दोन लाख रुपयांसाठी मानसिक व शारिरीक छळ होत असल्याचा आरोप यावेळी नातेवाइकांनी केला.
धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सुवर्णा (वय २२) हिचा पाचोरा तालुक्यातील गाळण येथील योगेश चुडामन पाटील यांच्याशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. योगेश नाशिक येथे कंपनीतनोकरीस असून त्याच्या भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल आहेत. मुलीचे वडिल सूर्यभान सीताराम पाटील यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असुन ते सालदारकी करतात. आई अनिता पाटील मजुरी करतात. मुलगानोकरीला असल्यामुळे त्यांनी ७ लाख रुपये हुंडा कबूल केला.
कर्ज काढून विवाहाप्रसंगी त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर माहेरहून २ लाख रुपये आणण्यासाठी तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा ही माहेरी आल्यानंतर तसेच फोनद्वारे सांगत होती. दरम्यान, १ जूनला रात्री ७ वाजता आईने सुवर्णास फोन केला. त्यावेळी माझी नणंद एक महिन्यापासून येथे आली असून ती २ लाखांसाठी माझ्याशी सतत भांडत असल्याचे सुवर्णा हिने आईला सांगितले.
पती नाशिकला तर सासू होती गावाला
सुवर्णाचा जेठ मोहन पाटील हा नाशिक येथे राहतो. त्याचा अपघात झाल्याने तो तेथील ओखार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तर त्याचा भाऊ योगेश हा देखील देखभालीसाठी गेला आहे. सुवर्णाची सासू दोन दिवसांपासून बाहेरगावी गेली आहे. तर सासरे चुडामण पाटील हे पाचोरा येथे सूर्यफूल विकण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. घटनेप्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.