आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मेळावा:किती लोकांना मदत केली याची यादी तयार करा ; गुणवंतांचा केला सत्कार

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन सुंदर आहे. त्याचा आनंद घेतला पाहिजे. आपण किती लोकांना मदत केली याची यादी तयार करा, राजकारणात अरुण गुजराथी याच्या विरोधात कैलास पाटील निवडून आले होते आणि आज एकाच मंचावर आहेत याला समृद्ध राजकारण म्हणतात. ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुंदर होण्यासाठी राजकारणातील लोकांनी कामे केली पाहिजे, असे आवाहन पुणे येथील व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर बोलतांना केले. राष्ट्रवादी व मित्र परिवारातर्फे अकुलखेडा येथे शेतकरी मेळावा, व्याख्यान व गुणवंतांचा गौरव झाला. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घन:श्याम अग्रवाल, इंदिराताई पाटील, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा विजया पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, जीवन चौधरी, नीता पाटील, गोकूळ पाटील, निवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग, डॉ. विकास हरताळकर आदी मंचावर हजर होते. या वेळी युपीएसस्सी उत्तीर्ण गौरव साळुंखे, स्वरा हरताळकर, पंकज बोरोले, प्रवीण पाटील, खेळाडू तेजस महाजन, कुलदीप महाजन, वरगव्हाण येथील गोरख पाटील, आदर्श शेतकरी सुनील पाटील, वेट लिफ्टिंगमध्ये राज्यस्तरावर आलेली राजवी पाटील, डॉ. धीरज साळुंखे यांनी एमबीबीएसमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...